पश्चिम रेल्वेवर हिवाळी विशेष गाड्या !

पश्चिम रेल्वेवर हिवाळी विशेष गाड्या !

पश्‍चिम रेल्‍वे मार्गावर हिवाळी विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : हिवाळ्याच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि गांधी धाम स्थानकांदरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गांधी धामदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९४१५ वांद्रे टर्मिनस- गांधी धाम स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी संध्याकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता गांधी धामला पोहोचेल. ही ट्रेन ११ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०९४१६ गांधीधाम-वांद्रे टर्मिनस स्पेशल गांधीधाम येथून दर गुरुवारी रात्री १२.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ११ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, विरमगाम, ध्रांगध्रा, समखियाली आणि भचौ स्थानकावर थांबेल. या साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com