फातिमा शेख यांची १९३ वी जयंती साजरी
मुंबादेवी, ता. ९ (बातमीदार) ः दक्षिण मुंबई येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांच्या कार्यालयात मंगळवारी (ता.९) सायंकाळी पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दक्षिण मुंबई सरचिटणीस शिरीष चिखलकर यांनी फातिमा शेख यांचा अल्प परिचय उपस्थितांना करून दिला. सत्यशोधक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष बुधाजी पडवळ, गौतम महाडिक, सिद्धार्थ रणपिसे, विशाल गायकवाड आणि दादासाहेब जाधव उपस्थित होते.
ज्या काळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात मानले जात होते, अशावेळी सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाईं फुले यांच्या सोबत फातिमा शेख शिक्षिकेच्या रूपात होत्या. त्यांनीच भिडे वाड्यात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना राहण्यासाठी आणि शाळेसाठी जागा दिली होती. मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा उघडण्यासाठीही जागा दिली. ज्यावेळी शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत फातिमा शेख यांनी शाळा आणि घराघरात जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडत होत्या. अशावेळी त्यांना समाजातील काही उच्चवर्णीय लोकांच्या विरोधालाचाही सामना करावा लागला होता, असे शिरीष चिखलकर यांनी फातिमा शेख यांची महती विशद करताना म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.