चिंचघरच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन

चिंचघरच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन
Published on

वाडा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते पार पडले. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे चिंचघर गावातील महिलांची अनेक वर्षांपासून पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

वाडा तालुक्यातील चिंचघर हे गाव अनेक वर्षांपासून पाणीटंचाईग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. गावाजवळ पाण्याचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसल्याने कूपनलिका व विहिरीच्या पाण्यावर ग्रामस्थांना पाण्याची दैनंदिन गरज भागवावी लागते. गावात २० वर्षांपूर्वी बनवलेली नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून गावाचा विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता या नळ पाणीपुरवठा योजनेचा स्रोत कमी पडतो. जलजीवन मिशन योजनेंतर्गत चिंचघर गावासाठी सव्वातीन कोटी रुपयांची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून डोंगस्ते येथील लघुपाट बंधारे प्रकल्पावरून पाण्याचा पुरवठा होणार आहे. पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करून देणारे सुरेश कुमार जैन यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी शिवसेना उपनेते पांडुरंग पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष नीलेश पाटील, स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील, सचिन पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख भावेश पष्टे, डोंगस्ते सरपंच विशाल आहाडी, पोलिस पाटील प्राची ठाणगे, उपसरपंच मनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, साक्षी विग्ने, संगीता भोईर, नासिर सुसे, हुसेन मेमन, माजी उपसरपंच भाई पाटील, मुकुंद पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com