

रायगड बातम्या थोडक्यात
सिद्धी घाडगे रायगड रत्न कला गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित
माणगाव (बातमीदार) ः रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शुक्रवारी पार पडलेल्या रायगड रत्न कला गौरव पुरस्कार २०२४ ने सिद्धी घाडगे हिला सन्मानित करण्यात आले. सिद्धी घाडगे ही इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असून वक्तृत्व, पोवाडा, अभिनय इत्यादी कलांमध्ये तिने प्राविण्य मिळवले आहे. तिने अनेक कला पुरस्कार मिळवले आहेत. विशेष म्हणजे शिवधर्म फाऊंडेशन रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात तिने लहान वयात आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. एक हरहुन्नरी बालकलाकार म्हणून सिद्धीची रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे. पथनाट्य, शॉर्ट फिल्म यामध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिला प्राप्त झालेल्या रायगड रत्न कला गौरव पुरस्काराबद्दल तिचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, ॲड. राजीव साबळे, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर, डॉ. अजय मोरे, विपूल उभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.