Navi Mumbai News: काही पैशांसाठी रिक्षाचालकाला मारहाण करून लुबाडले!

Crime News
Crime Newssakal
Published on

Navi Mumbai News: प्रवासी घेण्यासाठी पनवेल रेल्वेस्थानकाजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून त्याच्याजवळ असलेली रोख रक्कम लुटण्यात आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

नवीन पनवेल येथील सुकापूर भागात राहणारे रिक्षा चालक प्रवीण सावंत (४९) शनिवारी (ता. २७) रात्री ७.३० च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला प्रवासी घेण्यासाठी उभे होते. यावेळी अंधारात आलेल्या एका गृहस्थाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावर सावंत यांनी पैसे नसल्याचे सांगून त्याला विरोध केला.

मात्र, संबंधित व्यक्तीने सावंत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी सावंत यांनी त्याला विरोध केला. तरी देखील लुटारूने सावंत यांच्या खिशातील १,४०० रुपये असलेले पाकीट जबरदस्तीने काढून घेत पलायन केले. या घटनेनंतर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com