badlapur panvel highway tunnel
badlapur panvel highway tunnelesakal

Badlapur Panvel Highway: बदलापूर ते पनवेल अंतर थेट २० मिनिटांत, बोगद्याचे काम ५० टक्के पूर्ण

badlapur panvel highway tunnel: पुढील वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे बदलापूर शहर सगळ्याच मोठ्या शहरांशी जोडले जाणार आहे.

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : बदलापूरहून नवी मुंबईतील विमानतळाचे अंतर आता वीस मिनिटात पार करता येणार आहे. वडोदरा-जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. बदलापूर पूर्व बेंडशीळ या गावातून जाणाऱ्या जेएनपीटी महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे.

पुढील वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे बदलापूर शहर सगळ्याच मोठ्या शहरांशी जोडले जाणार आहे. मंगळवारी (ता. १३) या बोगद्याच्या कामाची पाहणी वडोदरा जेएनपीटी प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केली.

राज्यात वडोदरा ते जेएनपीटी महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे. १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग आहे. हा रस्ता बदलापूर शहरातील बेंडशीळ या गावातून जात आहे. त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम मागील वर्षांपासून सुरू आहे.

आजच्या घडीला हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. जुलै २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल त्यानंतर, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

महामार्गामुळे बदलापूर शहराचा दळणवळणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कायापालट होणार आहे. अनेक मोठमोठ्या शहरांना बदलापूर शहराची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या बेंडशीळ गावातून इंटरचेंज आहे. या ठिकाणी डोंगरातून जवळपास सव्वा चार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर बदलापूर शहर हे नवी मुंबई, मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर, दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे. तसेच बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे. तसेच मुंबईतदेखील चाळीस मिनिटात पोहोचता येणार आहे.

महाराष्ट्रात वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात आहे. त्यामुळे, बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला चालना मिळणार आहे. पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाट सुरु झाली आहे. बदलापूर हे शहर या महामार्गामुळे देशात नाव रूपाला येणार आहे.
- किसन कथोरे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com