Crime
Crimesakal

Crime: अल्पवयीन मुलीवर वृद्धाकडून अत्याचार; पोलिस कोठडीत रवानगी

Thane News: अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Crime
Crime News: झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने ओतले ॲसिड; कारण ऐकून बसेल धक्का

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वागळे इस्टेट येथील वाल्मीकी पाडा भागात असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाच्या छतावर महावीर बुंबक नामक वृद्धाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला नेत तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार गुरुवारी (ता. २२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. परिसरातील काही नागरिकांनी या वृद्धाला मुलीला शौचालयावर घेऊन जाताना पाहिले. त्यानंतर त्यांनी बुंबक यांना रंगेहाथ पकडले.

Crime
Nandurbar Crime News : तोंडावर रुमाल बांधून आले अन् केलं ATM मशिन गायब; 26 लाखांवर डल्ला

दरम्यान, बुंबकने गेल्या ऑक्टोबर ते २२ फेब्रुवारी या काळात मुलीला धमकी, दमदाटी आणि काही पैशांचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले.

श्रीनगर पोलिसांनी बुंबकवर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Crime
Jalgaon Fraud Crime : ‘भिशी’ च्या नादात 13 गृहिणींना दांपत्याने लावला 55 लांखाचा चुना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com