

मोखाडा, ता. ३ (बातमीदार) : कठीण, प्रतिकूल परिस्थितीत एखादी महिला हिंमत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कुटुंबाचा गाडा चालवते. तसेच समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करते. त्यांचा सन्मान करणे आणि महिला सशक्तीकरण, नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खोडाळ्यातील समर्थ सामाजिक संस्थेने गावातील पाच महिलांचा नारीशक्ती सन्मान देऊन सत्कार केला.
पतीच्या निधनानंतर किंवा पतीच्या आजारपणात, पाठीशी कोणताही आधार नसताना, कुटुंब चालवत सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचे अतुलनीय काम करणाऱ्या सुशीला घनःशाम खैरनार, सुनंदा शिवाजी काळे, अंजना संदीप थाळेकर, गंगूबाई अनंता ठोमरे आणि सरला जयराम पाटील या पाच महिलांना साडी चोळी, पुष्पगुच्छ देऊन नारीशक्ती सन्मान करण्यात आला आहे. समाजापुढे आणि सेवाभावी संस्थांपुढे हा सन्मान उपक्रम राबवून एक नवा आदर्श समर्थ सामाजिक संस्थेने निर्माण केला आहे. नारीशक्ती सन्मान सोहळ्याबरोबरच समर्थ सामाजिक संस्थेने चूल आणि मूल या भावविश्वात रमणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला होता. खेळात प्रथम क्रमांक पटकावत छाया देवराम चव्हाण यांनी पैठणी जिंकली आहे; तर मंजुळा विजय वाघ आणि स्वाती संतोष शेलार यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. हळदी-कुंकू कार्यक्रमात ४०० महिलांना वाण देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.