mithi river
mithi river sakal

Mumbai News: मिठी नदीच्या रुंदीकरणातील अडथळा अखेर झाला दूर; ६७२ झोपड्या हटवल्या


मुंबई, ता. १ : मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या ६७२ झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामांवर काल आणि आज पालिकेने धडक कारवाई केली. या कार्यवाहीमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला आहे. नदीपात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटरवर नेण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

mithi river
Mumbai News: सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेट; पोलिसांकडून कारवाई

मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाहाला वाट मोकळी करून देणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांतून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी काम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये बक्षी सिंग कम्पाऊंड येथील १०० मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सध्या त्या ठिकाणी सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे पालिकेने सांगितले.

mithi river
Mumbai Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; प्रवास करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती

मिठी नदीच्या पात्रात किंवा पात्रालगत अनधिकृत झालेली बांधकामे निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या वतीने २९ फेब्रुवारी आणि १ मार्चदरम्यान धडक मोहीम हाती घेण्यात आली. त्याअंतर्गत ६७२ झोपड्या तसेच अन्य बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला.

आता या संपूर्ण परिसरात मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीत उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

mithi river
Mumbai Metro: वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावरील सात स्थानकांचा होणार कायापालट!

प्रदूषणावर नियंत्रण होणार


पालिकेच्या धडक कारवाईमुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल. तसेच मिठी नदीत उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

mithi river
Navi Mumbai: २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचा गणवेश; १२ कोटी रुपयांची तरतूद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com