सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकाचे धडे

सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकाचे धडे
Published on

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ३ : सेवापुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीचा आरसा असल्याने सेवापुस्तक तसेच सेवानिवृत्ती वेतनविषयक माहितीपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ गांभीर्याने घ्यावा व त्याचा उपयोग आपल्या कामकाजात करावा याकरिता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यालयीन कामकाजातील ज्ञान अद्ययावत होण्यासाठी विविध प्रशासकीय बाबींवरील प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येत आहे.
सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांचे ‘सेवानिवृत्ती वेतन व सेवा पुस्तक’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या प्रसंगी महापालिकेच्या विविध विभागांतील प्रशासकीय कामकाज व त्यातही सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय नियमांचा व त्यांच्या अंमलबजावणीचा प्रदीर्घ अनुभव असणारे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांनी या प्रशिक्षण वर्गात दैनंदिन कामकाजातील अनेक उदाहरणे देत महाराष्ट्र नागरी सेवा नियम सोपा करून सांगितला. सेवानिवृत्ती वेतन व सेवा पुस्तक याविषयी विस्तृत माहिती देत त्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी त्यांनी उलगडून दाखवल्या. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा उद्देश हा कार्यप्रणालीत पारदर्शकता निर्माण करणे व सेवा पुस्तक कसे अद्ययावत करायचे हा असून त्यादृष्टीने कामकाज करणे अपेक्षित असल्याचे प्रशिक्षक वसंत चौधरी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com