पालघरमध्ये शिवराज्याभिषेक महानाट्य

पालघरमध्ये शिवराज्याभिषेक महानाट्य
Published on

पालघर, ता. ३ (बातमीदार) : ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त ६ ते ८ मार्च या कालावधीत रात्री ७ ते १० या वेळेत पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये महानाट्याचा अनुभव घेता येणार आहे. या महानाट्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महानाट्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना प्रवेशपत्र जिल्हा प्रशासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनजागृती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेषकरून तरुणपिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास गोविंद बोडके यांनी व्यक्त केला. महानाट्य सादरीकरण करण्यासाठी सरकारने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीची स्थापना केली असून, जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com