कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन

कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन

कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः स्‍वातंत्र्यसैनिक मास्‍टर आर्टिस्‍ट रुमाले चेन्नबसवय्या यांच्या चित्रांचे ‘वर्ण मैत्री’ हे प्रदर्शन मुंबईमधील प्रतिष्ठित नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भरवण्यात आले आहे. १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला कलाप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
रुमाले यांचा कलात्मक वारसा पूर्वी प्रामुख्याने कर्नाटकात ओळखला जात होता. आता प्रथमच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना त्यांची ओळख होत आहे. या पूर्वलक्षी प्रदर्शनात ८० कलाकृती आणि कलाकारांच्या ३ प्रिंट्स असतील. ज्यात कलाकाराने रंगवलेल्या विषयांच्या ३ प्रमुख शैलींचा समावेश आहे. मुंबईच्या डेप्युटी क्युरेटर श्रुती दास यांनी या प्रदर्शनाची सहनिर्मिती केली आहे.
कर्नाटकच्या कला समुदायाकडून ‘रुमाले’ असे प्रेमाने संबोधले जाणारे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ७८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अंदाजे ६०० कृती रंगवल्या. या प्रदर्शनात प्रख्यात शिल्पकार व्यंकटचेलापती यांनी रचलेल्या रुमाले चेन्नबसवय्या यांच्या आकर्षक प्रतिमेसह निसर्गाची भव्यता दर्शवणाऱ्या जलरंगातील लार्जर-दॅन-लाईफ रचना पाहायला मिळत आहेत.

कलेचा त्‍याग
रुमाले हे कलेचा त्याग करून १९३० ते १९४७ या कालावधीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह इतर दिग्गजांशी संवाद साधला. महात्मा गांधीजींसोबतचे रुमाले यांचे छायाचित्र आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रदान केलेले ताम्रपत्र यांसारख्या दुर्मिळ कलाकृती प्रदर्शनात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com