बदनामीकारक मजकूरप्रकरणी 
गुन्हा दाखल करण्याची मागणी

बदनामीकारक मजकूरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

वाडा, ता. १० (बातमीदार) : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांची सोशल मीडियावर बदनामी करणारी पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जयेश शेलार यांनी वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गोविंद मामा विचार मंच व जय महाराष्ट्र या नावाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली आहे. या दोन्ही ग्रुपवर शेलार हे असल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वाडा पोलिसांकडे तक्रार करून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. सोशल माध्यमांद्वारे बदनामी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याला पायबंद घालण्याची गरज असून याप्रकरणी चौकशी करून बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com