Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: सायन-पनवेल महामार्गावरील काँक्रिटीकरणाला सुरुवात

आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन, कोट्यवधींचा निधी उपलब्ध |Bhumi Pujan by MLA Manda Mhatre, crores of funds available

Navi Mumbai : सायन-पनवेल महामार्गावरील काँक्रिटीकरणासहीत इतर कामांना सुरुवात झाली आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या सोयी-सुविधांच्या कामांचे भूमिपूजन झाले आहे. म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या कामांकरीता कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे.

Mumbai News
Mumbai News : भाजप पक्ष चिन्हाला काळे फासल्याप्रकरणी दोघांना अटक! आरोपी शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधीत

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे म्हात्रे यांनी त्यांच्यातर्फे विकास कामांचा धडाका लावला आहे. नवी मुंबईच्या विकासाबरोबरच आपल्या मतदारसंघामध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रीटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत.

Mumbai News
Mumbai News : तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमिन देणार नाही! सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी-बेलापूर जंक्शनचे काँक्रिटीकरण करणे ही तिन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने या सर्व कामांचा आज मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. गेल्या आठवड्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सायन-पनवेल महामार्गावरून बाहेरगावी जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या बसेस थांब्याजवळ प्रवाशी प्रतीक्षा कक्ष उभारण्याचे काम सुरू केले आहे.

वाशी, नेरूळ, बेलापूर येथेही एसटी थांबे आहेत. या थांब्यांवर प्रवाशांना कोणतीही सुविधा नसल्याने अनेकदा प्रवाशी त्रासलेले आढळतात. त्यांच्याकरिता प्रतीक्षा कक्ष, सुसज्ज उद्यान, तसेच शौचालय या सुविधा प्राप्त होणार आहेत. आता रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण केल्यानंतर वाहनांना ये-जा करण्याकरिता सोय होणार आहे. पावसळ्यात जे खड्डे पडून अपघात होतात त्याचे प्रमाण कमी होणार आहे, त्याकरिता या कामांसाठी तब्बल १६ कोटी ३८ लाख सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खर्च करण्यात येत आहेत.

Mumbai News
Mumbai News: दिवसा ऊन अन् रात्री थंडी; आजारी पडण्याचे प्रमाण वाढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com