नवी मुंबईतील ३० शाळांना ई- लर्निंग साहित्याचे वाटप

नवी मुंबईतील ३० शाळांना ई- लर्निंग साहित्याचे वाटप

नवी मुंबईतील ३० शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : तुर्भे येथील डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते नवी मुंबईतील ३० शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप करण्यात आले. या डिजिटल ई-लर्निंग इक्विपमेंटमध्ये प्रोजेक्टर, प्रोजेक्टर क्रीन, ट्रायपॉड स्टॅन्ड, स्पीकर, माईक, माऊस आदींचा समावेश असून यात महाराष्ट्र राज्याचा दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून आल्यावर सर्व शाळांना आधुनिक व ऑनलाईन करण्यासाठी कोकण विभागातील पाचही जिह्यांतील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० हजार रुपये किमतीचे ई-लर्निंग साहित्य देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्‍यांनी प्रथम नवी मुंबईतील ३० शाळांची निवड करून ई-लर्निंग साहित्‍य वाटले. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, तसेच जुनी पेन्शन, अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळवून देण्यासंबंधी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच वैद्यकीय बिले, शालार्थ आयडी, संचमान्यतेतील दुरुस्ती, अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर यांचे समायोजन, तसेच शिक्षक-शिक्षकेतरांची प्रलंबित कामे तत्काळ सोडवली जातील, असे आश्‍वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com