Vasai Virar: शुद्ध हवा कार्यक्रमासाठी ७२ कोटी ३५ लाखांचा निधी

Vasai Virar
Vasai Virarsakal
Published on

Vasai Virar: वसई-विरार महापालिका परिसरातील हवा शुद्ध राहावी यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.शुद्ध हवा कार्यक्रमासाठी पालिकेला १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ‘मिलियन प्लस सिटीज’अंतर्गत ‘एअर क्वॉलिटी’ सुधारण्याकामी मागील तीन वर्षांत तब्बल ७२ कोटी ३५ लाखांचा निधी चार टप्प्यांत प्राप्त झाला आहे

Vasai Virar
Vasai Virar News: त्या २९ गावांचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर; वाचा काय आहे प्रकरण

. त्यातून विविध विभागांकरिता विविध यंत्रसामग्रीसह विकासकामे केली असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून ‘मिलियन प्लस सिटीज’ अंतर्गत वसई-विरार महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २०२०-२१ या वर्षाकरिता प्रथम टप्प्यात १६ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १६ कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात १६ कोटी अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यानंतर २०२२-२३ या वर्षात प्रोत्साहनपर सात कोटी ३५ लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. शिवाय चौथ्या टप्प्यात १७ कोटी अनुदान प्राप्त झालेले आहे.

Vasai Virar
Vasai - Virar: महापालिकेच्या कारवाईत ४०० किलो प्लास्टिक जप्त!

वसई-विरार महापालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात हवा गुणवत्तेसाठी मंजूर सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन यांच्याकडून सुधारित आराखडा तयार केला आहे. तो ११ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला होता. या कृती आराखड्यास १० मार्च २०२१ रोजी मंजुरी मिळाली.

त्यानुसार ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा’साठी ७२ कोटी ३५ लाखांच्या निधीतून वसई-विरार महापालिकेने विविध विकासकामे हाती घेतलेली होती. यात वाहन विभागाकरिता ५७ इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रतिबसची किंमत एक कोटी ४३ लाख ५० हजार आहे. पालिकेने याकरिता सहा वर्षांचे लक्ष्य निर्धारित केलेले आहे. उपलब्ध निधीनुसार या बस खरेदी करण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

विकासकामांसाठी निधी


सहा रस्ते दुभाजक, शहरातील मियावाकी उद्याने उभारणे, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी विविध वाहने व यंत्रसामग्री खरेदी, गॅस शवदाहिनी, कारंजे उभारणी अशा विविध विकासकामांवर या निधीतील कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

Vasai Virar
Mumbai Virar Local: विरारच्या महिला हुशार, सीटसाठी अनोखा फंडा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Garbage piles up at the dumping ground in Gokhivre-Bhoydapada, raising concerns over air quality and public health in Vasai-Virar.
Thousands of hawkers marched to the Vasai-Virar Municipal Corporation demanding vending zones, identity cards and an end to eviction drives.
vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe
vasai virar municipal corporation
Marathi News Esakal
www.esakal.com