Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai mahapalika esakal

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना तूर्तास ‘जलदिलासा’; पाणीकपात नाही

यंदा मान्सून लांबल्यास नवी मुंबई शहरात पाणीकपात होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे | If the monsoon is prolonged this year, the water supply department is predicting the possibility of water shortage in the city of Navi Mumbai

Vashi News: नवी मुंबईकरांची तहान भागविणारे मोरबे धरण गतवर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण भरले होते. मोरबे धरणात सद्यस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा ५२.४२ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे तूर्तास नवी मुंबई महापालिकेकडून पाणीकपात करण्यात आलेली नाही. असे असले तरी नवी मुंबई पालिकेतील रहिवाशांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. यंदा मान्सून लांबल्यास नवी मुंबई शहरात पाणीकपात होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai News: ..तर पुढील पाच वर्षांत देशात एकही निवडणूक होणार नाही; आमदार जयंत पाटलांचा दावा

जूनमध्ये सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती; मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला. त्यामुळे नवी मुंबई शहरात २०२३-२४ मध्ये ३,७७०.४० मिमी पावसाची नोंद झाली; २०२२-२३ मध्ये ३,५५९.२८ मिमी पाऊस पडला होता.

गत वर्षापेक्षा यंदा अधिक पाऊस झालेला असतानादेखील वाढत्या लोकसंख्येमुळे नवी मुंबई महापालिकेकडून आठवड्यातील एक दिवस वॉर्डातील पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. नवी मुंबईत काही ठिकाणी पाणी मिळत नसल्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त करत पालिकेच्या विरोधात मोर्चा काढण्यास सुरुवात केली होती. सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी पाणी सुरळीत सुरू असून पाण्याचा दाबदेखील नियंत्रित आहे.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai: मनसे माथाडी सेनेचे गणेश म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश

एमआयडीसीकडून ७० एमएलडीची मागणी


सद्यस्थितीत नवी मुंबईत पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीकपात करण्यात येत नसली तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेला एमआयडीसीकडून ७० एमएलडी पाणी देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र ४० ते ४५ एमएलडी पाणी मिळत असल्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. एमआयडीसीकडूनदेखील ७० एमएलडी पाणी मिळावे यासाठी पालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेकडे २५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. पावसाळा लांबणीवर गेल्यास पाणी कपात करण्यात येईल. तूर्तास पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी नवी मुंबईकरांनी जपून पाणी वापरावे.
- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai News: नवी मुंबईच्या पोलिसांची मोठी कारवाई; आठ हजार ८२८ वाहनचालकांना दिला दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com