उच्च शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

उच्च शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

Published on

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात सहायक संचालकांकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी इतर मागास प्रवर्गासाठी ५९ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ३४ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, तसेच अनाथांकरिता १ टक्का आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी १२वीनंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांला या योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन अथवा सीजीपीए गुण असणे आवश्यक राहणार आहे. व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता १२ वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे. योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७० टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३० टक्के जागा बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निकष ठेवण्यात आले आहेत.

------------
विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता यासाठी ६० हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये, त्याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये; तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३८ हजार रुपये भोजन, निवास व निर्वाह भत्त्याकरिता देण्यात येणार आहे.

---------------
उच्च शिक्षण घेणाऱ्या व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातील सहायक संचालक मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधवा.
- वंदना कोचुरे, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com