Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल

Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल

वाढत्या तापमानामुळे राज्याला उष्माघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजित राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळेत हे निर्देश देण्यात आले|These instructions were given at a disaster management workshop in the state organized to keep the state safe from heat stroke due to rising temperatures

Thane News: तापमानाच्या दृष्टीने सेफ झोन म्हणून ओळखला जाणारा ठाणे जिल्हा हळूहळू डेंजर झोनकडे सरकू लागला आहे. (Thane Tempreture News)

जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचत असल्याने भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. वाढत्या तापमानामुळे राज्याला उष्माघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजित राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळेत हे निर्देश देण्यात आले.

Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल
Thane News: भिवंडीत ऐन रमजान महिन्यात पाणीटंचाई

ठाणे जिल्हा गेल्या काही वर्षांपूर्वी येलो झोनमध्ये (सेफ झोन) होता. या जिल्ह्याचे तापमान आणि उन्हाळ्यात (एप्रिल, मे) ३५-३७ अंशांपर्यंत जात होते. आता मात्र जिल्ह्याच्या तापमानात हळूहळू वाढ होऊन ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू लागले आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी गेल्या महिन्यात जळगाव येथे उष्माघाताविषयी कार्यशाळा झाली.

Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल
Thane Politics: आनंद परांजपे आणि नजीब मुल्लांना महायुतीत महत्व नाही; शरद पवार गटाच्या नेत्याची टिका

या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सहभागी झाला होता. या कार्यशाळेत महाराष्ट्र हे देशातील उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदनशील राज्यांपैकी एक असल्याची माहिती देण्यात आली. पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवर चर्चा करण्यात आली

१९५१मध्ये ठाणे जिल्ह्याचा येला झोनमध्ये समावेश होता; मात्र आता तो २०२२मध्ये काहीसा ऑरेंज झोनकडे सरकला असल्याचे हवामान खात्याने निदर्शनास आणून दिले आहे. आता गेल्या वर्षीपासून ठाणे जिल्ह्यातील काही भागांतील तापमान ४० अंशांपुढे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा जिल्हा रेड झोनमध्ये सामील होण्याचा धोका संभवतो आहे. म्हणूनच जिल्ह्यात झाडांची विशेषतः बांबूच्या झाडांची लागवड करण्याच्या सूचनाही या कार्यशाळेत देण्यात आल्या.

Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल
Thane Politics: आनंद परांजपे आणि नजीब मुल्लांना महायुतीत महत्व नाही; शरद पवार गटाच्या नेत्याची टिका

तज्ज्ञांची उपस्थिती


जळगाव येथे पार पडलेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत पर्यावरणमंत्री अनिल पाटील, प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक सुनील कांबळे, युनिसेफचे अधिकारी आनंद घोडके, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे राज्य हवामान कृती कक्ष संचालक अभिजित घोरपडे, कृषी विभाग प्रकल्प संचालक (निवृत्त) अनिल भोकरे, नागपूर जिल्हा अनिरुद्ध आरोग्य नागपूर जिल्हा आणि आरोग्य अधिकारी (निवृत्त) डॉ. एन. एम. राठी आदी तज्ज्ञ उपस्थित होते.

Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल
Thane Crime: गरजू तरुणींकडून करुन घ्यायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com