Mumbai News: भाडे वाढ करण्यास मिळाली मंजूरी; पुणे, नाशिकचा गारेगार प्रवास महागला
Mumbai News: भाडे वाढ करण्यास मिळाली मंजूरी;पुणे, नाशिकचा गारेगार प्रवास महागलामुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे जाणाऱ्या कूल कॅबच्या (शेअर टॅक्सी) भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
या तिन्ही मार्गांवरील काळ्या-पिवळ्या साध्या टॅक्सी आणि निळ्या-सिल्व्हर एसी टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. ही दरवाढ ५० ते २०० रुपयांपर्यंत आहे. यामुळे उन्हाळी सुट्टीत प्रवास करणाऱ्यांचा कूल कॅबचा प्रवास महागला आहे.
नाशिक, पुणे आणि शिर्डी या मार्गांवर निळ्या-सिल्व्हर एसी आणि काळ्या-पिवळ्या साध्या टॅक्सी चालवल्या जातात. या सेवांना प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. इंधनाचे दर, देखभाल-दुरुस्ती खर्च लक्षात घेऊन प्रमुख टॅक्सी संघटनांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या सेवांच्या प्रतिप्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली. मुंबईहून पुण्याला एसी आणि साध्या टॅक्सींकरिता ५० रुपये, नाशिककरिता १००, तर शिर्डीसाठी २०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. याआधी ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबई-पुणे मार्गावरील एसी-साध्या टॅक्सींचे भाडे वाढवले होते.
ही नवीन भाडेवाढ नाही!
त्यामुळे त्यांना मुंबई-नाशिकसाठी फक्त १०० रुपये भाडेवाढ देण्यात आली आहे आणि मुंबई-पुणेसाठी, सध्याच्या टॅक्सी दरांच्या आधारावर ५० रुपये भाडेवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही नवीन भाडेवाढ नाही, असे परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.