रोटरी क्लब ऑफ पालघरमार्फत प्रोटीन पावडरचे वाटप

रोटरी क्लब ऑफ पालघरमार्फत प्रोटीन पावडरचे वाटप

विक्रमगड (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे गेल्या दहा वर्षांपासून ‘सशक्त माता-सुदृढ बालक’ हा कुपोषित माता व बाल संगोपन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामध्ये विक्रमगडमधील भोपोली येथील डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या श्रीमती जानकी बच्चू दुबे होमिओपॅथीक ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य घेण्यात येते. रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँड अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे गरोदर मातांना कॅल्शियम, आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, प्रोटीन पावडरचे डबे आणि गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल, त्यांना सुक्रोज इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. एकूण ११० गरोदर माता व त्यांच्या बाळांना फायदा होणार आहे. ढवळे हॉस्पिटलचे डॉ. सुजित स्वामी हे हा प्रकल्प सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला पालघर रोटरीचे अध्यक्ष जयेश आव्हाड, सचिव भूषण सावे, प्रकल्प प्रमुख भगवान पाटील आणि रफिक धडा, माजी अध्यक्ष हनीफ धनानी, अमित पाटील, संजय महाजन, अमित राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com