आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय आरोग्य कार्यक्रम

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय आरोग्य कार्यक्रम

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील १० सरकारी आश्रमशाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने चाईल्ड हेल्प फाऊंडेशनतर्फे शालेय आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक दायित्वाची अंमलबजावणी प्रकल्पांचा एक भाग म्हणून हा शालेय आरोग्य कार्यक्रम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करून मदत करणे हा आहे.

दादडे येथील अरविंद आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजपूत राणे म्हणाले की, आमच्या शाळेत शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या मदतीने आजारी पडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी झाले आहे. शालेय आरोग्य कार्यक्रम टीम दर गुरुवारी आमच्या शाळेत येते आणि विद्यार्थ्यांसाठी जागरुकता सत्रे, वैयक्तिक समुपदेशन आणि इतर आरोग्यविषयक मुद्द्यांवर मार्गदर्शन करते. आमच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपयुक्त कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

चाईल्ड हेल्प फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस म्हणाले की, ग्रामीण भारतात कुपोषण ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. पोषक तत्त्वांच्या असंतुलनामुळे मुलांमध्ये अनेक रोग होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि संभावनांना हानी पोहोचते. या मुलांना आरोग्यसेवा पुरवण्याचे आमचे ध्येय आहे, जेणेकरून ते त्यांच्या आरोग्याची चिंता न करता त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतील. या मोहिमेंतर्गत चाईल्ड हेल्प फाऊंडेशनने प्रत्येक शाळेसाठी हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टीम स्थापन केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com