हळदी समारंभावेळी सोन्याचे मंगळसूत्र लंपास

हळदी समारंभावेळी सोन्याचे मंगळसूत्र लंपास

भिवंडी (बातमीदार) : नातेवाईकांकडे हळदी समारंभासाठी गेलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सावंदे गावातील लीना भोईर ही महिला तिच्या गुंदवलीतील नातेवाईकांकडे रविवारी (ता. ३१) रात्री हळदी समारंभाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांनी तीन लाख ६० हजार रुपये किमतीचे १२ तोळे वजनाचे मंगळसूत्र आपल्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवले होते. लीना मंगळसूत्र ठेवत असताना त्यावर पाळत ठेवून असणाऱ्या अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रात्री ९ ते १२ च्या दरम्यान मंगळसूत्र लंपास केला आहे. ही बाब लक्षात येताच लीना भोईर यांनी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com