Crime News
Crime Newssakal

Crime News: चार वर्षांच्या मुलासह बेपत्ता झालेल्या महिला सापडली युपीमध्ये; पोलिसांना आले यश

Uran News: उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील चार वर्षांच्या मुलासाह १५ मार्चपासून बेपत्ता असणाऱ्या विवाहित महिलेला उरण पोलिसांना शोधण्यात यश आले आहे. सदर महिलेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शोधून काढले आहे. त्यामुळे उरण पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

Crime News
Crime News: १९९५ मध्ये हत्या, २९ वर्षांनी अटक पोलिसांनी केली अटक

कळंबुसरे येथील विवाहित महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाली होती. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. लहान मुलासह बेपत्ता झाल्यामुळे परिसरात वेगवेगळे तर्क-वितर्क वर्तविण्यात येत होते. ही महिला १५ मार्चला सिनेमा बघायला जाते असे सांगून मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली होती.

Crime News
Crime News: १९९५ मध्ये हत्या, २९ वर्षांनी अटक पोलिसांनी केली अटक

मात्र उशिरापर्यंत घरी न आल्‍याने तिच्या पतीने याबाबत उरण पोलिसांमध्ये हरविल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना या महिलेचे एका परप्रांतीय व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध असल्याचे पुरावे मिळाले होते. हा परप्रांतीय व्‍यक्‍ती तिच्‍या शेजारीच सलूनमध्ये काम करत होता.


उरण पोलिसांनी सर्वात प्रथम या परप्रांतीय व्‍यक्‍तीचा उत्तर प्रदेश येथील पत्ता शोधून काढला. त्‍यानंतर उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांच्‍या मार्गदर्शनाखाली संबंधित पत्‍त्‍यावर शोध घेण्यात आला असता, सदरील महिला चार वर्षांच्‍या मुलासह सापडली. उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाटील, महिला पोलिस रचना ठाकूर यांनी शिताफीने तपास केला.

Crime News
Nashik Crime: पार्टी केली अन् डोक्यात दगड घालून गेले; चिंचोली गुरव येथून बेपत्ता तरुणाचा मृतदेह सिन्नरच्या कहांडळवाडीत सापडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com