बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण रखडले

बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण रखडले

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारातील ७०० हून अधिक बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे. परवान्यांचे लवकरात लवकर नूतनीकरण झाले नाही तर आंदोलन करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
घाऊक फळबाजार आवारात व्यवसाय करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना बाजार समितीचा परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यापारासाठी व्यापाऱ्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्षात बाजार आवारात सर्वच व्यापाऱ्यांना गाळा देणे शक्य नाही. त्यामुळे सध्या गाळाधारक आणि बिगरगाळाधारक व्यापारी येथे व्यवसाय करत आहेत. ज्यांना स्वतःचा गाळा नाही त्यांना ओपन शेडमध्ये व्यापार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यांना व्यवसाय परवान्यांचे वार्षिक नूतनीकरण करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर हे परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. त्यानुसार फळ बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बाजार समितीकडे जमा करूनही अद्याप त्यांचे नूतनीकरण झाले नाही. परवाना नूतनीकरण झाले नाही तर व्यापाऱ्यांना बाजारात व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.

---------
बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांच्या परवाना नूतनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. व्यापाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक झाली आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
- संगीता अढांगळे, उपसचिव, फळ बाजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com