रोहिदास समाजात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान

रोहिदास समाजात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : रोहिदास समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई महापालिका संत शिरोमणी रोहिदास जयंती समन्वय समितीच्या संत रोहिदास समाजभूषण आणि संत शिरोमणी विशेष कार्य सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
आयकर विभागात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते राजेश शांताराम मासवकर यांचा संत शिरोमणी विशेष कार्य सन्मान पुरस्कार २०२४ खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. दादर नायगाव येथील शारदा मंगल कार्यालयात समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा माजी महापौर स्नेहल आंबेकर होत्या. समितीचे अध्यक्ष सूर्यकांत आंबेकर, सरचिटणीस डॉ. शांतारामजी कारंडे, राजेश खाडे, सुभाष आंबोकर, शशिकांतजी नांदगावकर, आरती पुगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com