Crime News
Crime Newsesakal

Crime News: पथकाने पाठलाग करून केले ५४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Mumbai Crime News: शाहूनगर पोलिसांची कारवाई; एका तरुणाला केली अटक | Shahunagar police action; A youth was arrested

Dharavi News: धारावीतील शाहूनगर पोलिस ठाणे हद्दीत अमली पदार्थविरोधी गस्‍त सुरू असताना ५४ लाख रुपयांचे हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला. पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

ही कारवाई शाहूनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद आव्हाड यांच्या पथकाने केली.

Crime News
Dharavi Umesh Keelu Success Story : पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश' कसा बनला आर्मी ऑफिसर?

केमकर चौक येथून रहेजा पुलाकडे जात असताना पोलिसांना हा २५ वर्षीय तरुण दिसला. त्‍याच्या हालचाली संशयास्पद वाटल्‍याने सहायक पोलिस निरीक्षक सतेश मस्के यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. त्‍याने पळून जाण्याचा प्रयत्‍न केला असता पथकाने पाठलाग करून त्‍याला पकडले. त्‍याच्याकडे असलेल्‍या पिशवीमध्ये ५४ लाख रुपये किमतीचा २७० ग्रॅम हेरॉईन हा अमली पदार्थ आढळला.

Crime News
Dharavi Redevelopment: ठाकरेंना नाकारलं, शिंदेंना देणार का?; अदानींच्या धारावी प्रोजक्टसाठी राज्याची केंद्राकडे मोठी मागणी

अंगझडती घेतली असता रोख ५ हजार, मोबाईल सापडला. शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सतेश मस्के, परिमंडळ ५ च्या पोलिस उपआयुक्त तेजस्वी सातपुते, माहीम विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय कुरंदकर, शाहूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Mumbai Dharavi: धारावी पूनर्विकास प्रकल्पाला मुलुंडमधील जागा हस्तांतरीत करा; गृहनिर्माण विभागाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com