नाल्यात निळे पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

नाल्यात निळे पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : औद्योगिक वसाहतीतील एका नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. तसेच याबाबत सकाळमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. याची दखल घेत बुधवारी (ता. ३) कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण डोंबिवली पालिकेने संयुक्तपणे सोनारपाडा, माणगाव येथील जीन्स धुण्याच्या तसेच साबण अन् ॲसिड बनविणाऱ्या कारखान्यांसह भंगार गोदामांवर कारवाई केली आहे.

औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास अधूनमधून होत असतो. याआधीही रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले आहेत. मंगळवारी (ता. २) पुन्हा एकदा येथील निवासी भागातील नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार घडला होता. रासायनिक कंपन्यांनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता; तर कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निळे पाणी कशामुळे वाहत आहे, याचा तपास सुरू केला होता.

दरम्यान या शोध मोहिमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, केडीएमसीचे ई प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार आणि कामा संघटनेचे देवेन सोनी सहभागी झाले होते. या धाडीत ललित काटा सोनारपाडा येथे बंद पडलेल्या एका बेकरीत जीन्स धुण्याचा कारखाना चालू असल्याचे निदर्शनास पडले. येथूनच निळे पाणी वाहत होते. साबण आणि बनविणाऱ्या अशा दोन फॅक्टरी माणगाव परिसरात चालू असल्याची आढळून आली. कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी बंद केल्या आहेत.

सोनारपाडा येथील आठ भंगाराची गोदामेदेखील या कारवाईत तोडण्यात आली. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरूच राहील.
- भारत पवार, सहायक आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com