Mumbai Local News: गव्‍हाण रेल्‍वे स्‍थानकाची रखडपट्टी; जासईवासीयांची गैरसोय

Mumbai Local News: गव्‍हाण रेल्‍वे स्‍थानकाची रखडपट्टी; जासईवासीयांची गैरसोय

रेल्वे स्थानक परिसरातील जासई, बेलपाडा, चिर्ले, गावठाण आदी गावांतील नागरिकांची गैरसोय होत आहे |The citizens of Jasai, Belpada, Chirle, Gavthan etc. villages in the railway station area are facing inconvenience.

Uran News: उरण रेल्वे सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र रेल्वे मार्गावरील गव्हाण स्थानकाचे काम अजूनही रेंगाळले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील जासई, बेलपाडा, चिर्ले, गावठाण आदी गावांतील नागरिकांची गैरसोय होत आहे.

एकीकडे उरण एनएमएमटी बंद आहे व दुसरीकडे परिसरातील गव्हाण स्टेशनचे काम रखडले आहे. यामुळे जासई परिसरातील नागरिकांना एसटीच्या किंवा खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Mumbai Local News: गव्‍हाण रेल्‍वे स्‍थानकाची रखडपट्टी; जासईवासीयांची गैरसोय
Mumbai Local News|आनंदाची बातमी: पनवेल-कर्जत प्रवास होणार अजूनच फास्ट; तिन्ही बोगद्याचे काम  ८० टक्के पूर्ण

उरण रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. बहुचर्चित अशी अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेली उरण रेल्वे सेवा अखेर सुरू झाली; मात्र अद्यापही या मार्गावरील अनेक स्‍थानकांचे काम अपूर्ण आहे. उरण ते नेरूळ-बेलापूर रेल्वे मार्गावरील गव्हाण हे अंत्यत महत्त्वाचे स्थानक आहे; मात्र या स्थानकाचे काम मध्य रेल्वे व सिडको प्रशासनाच्या माध्यमातून अगदीच धीम्या गतीने सुरू आहे.

जासई, बेलपाडा, चिर्ले ही गावे गव्हाण रेल्वे स्थानकाजवळ आहे. परिसरातील अनेक चाकरमानी, विद्यार्थी मुंबई व नवी मुंबई परिसरात शिक्षण, नोकरी- धंद्यानिमित्त ये-जा करतात; मात्र जवळपास फेब्रुवारीपासून उरण परिसरात नवी मुंबई महापालिकेने एनएमएमटी बस सेवा बंद केली आहे. याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगलाच बसत आहे. एसटीचा बेभरोशी प्रवास.

तर दुसरीकडे रिक्षा, टेम्पो, ट्रॅक्स याचा खर्चिक प्रवास यामुळे परिसरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्‍यामुळे जासई ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचे रेल्‍वेच्‍या सेवेकडे लक्ष लागले आहे. उरण रेल्वे मार्गावरील इतर स्थानकांबरोबरच गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. उरण, द्रोणागिरी न्हावा शेवा, रांजणपाडा या स्थानकांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून ही स्थानके रेल्वे प्रवासासाठी खुली करण्यात आली आहेत.

मात्र गव्हाण स्थानकात अजूनही फलाट, जिने, इतर बरीच कामे अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. त्‍यामुळे लवकरात लवकर स्‍थानकाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Mumbai Local News: गव्‍हाण रेल्‍वे स्‍थानकाची रखडपट्टी; जासईवासीयांची गैरसोय
Mumbai Local News: बॅटमॅनच्या कारवाईमुळे फुकटे घाबरले; तिकीट खरेदीत वाढ

गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम आम्ही शक्य तितक्या लवकर करण्याच्या प्रयत्नात आहोत; पण हे स्थानक नागरिकांसाठी कधी खुले होईल, हे नक्की सांगू शकत नाही.
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. जेणेकरून आम्हाला मुंबई, नवी मुंबई, पनेवल येथे जाण्यासाठी सुलभ होईल. शिवाय अतिरिक्त पैशांचा भुर्दंड पडणार नाही.
- सुरभी पाटील, विद्यार्थिनी

Mumbai Local News: गव्‍हाण रेल्‍वे स्‍थानकाची रखडपट्टी; जासईवासीयांची गैरसोय
Mumbai Local News: फलाट गाठण्यासाठी प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com