लवकरच आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

लवकरच आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

लवकरच आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
खारघर, ता. ४ (बातमीदार) : बहुप्रतीक्षेतील शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महापालिका शाळा, नगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद, स्वयंअर्थसाहाय्यित, जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य, पोलिस कल्याणकारी, विनाअनुदानित अशा आरटीईअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
यंदा आरटीई प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला आहे. दरवर्षी जानेवारीत शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थी नोंदणी सुरू होत असते; परंतु यंदा अनुदानित, सरकारी शाळांचाही समावेश करण्यात आल्याने यावर्षी प्रक्रियेस उशीर झाला आहे. गरीब, गरजू व मागसवर्गीय विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश अर्ज दाखल करता यावे, यासाठी शासनाने परिपत्रक जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, पनवेल पालिका क्षेत्रात जवळपास ११० खासगी शाळा आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत लागणाऱ्या दस्तावेजची माहिती देण्यात आली आहे. पालकांनी नोंदणी करताना आरटीई पोर्टलचा उपयोग करावा, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच पालकांच्या तक्रार निवारणासाठी तालुका आणि पालिकास्तरावर मदत केंद्राची निर्मिती करावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केल्‍या आहेत.
...................
प्राथमिक शिक्षण संचालकाकडून आरटीई प्रवेशप्रक्रिया संदर्भात परिपत्रक प्राप्त झाले आहे. मात्र, सदर परिपत्रकावर प्रवेशप्रक्रिया, तारीख नमूद नाही. मात्र, एक- दोन दिवसात प्रक्रिया सुरू होईल.
-सीताराम मोहिते, गटशिक्षण अधिकारी, पनवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com