पादचारी पुलाच्‍या अतिरिक्‍त उंचीमुळे प्रवाशांची दमछाक

पादचारी पुलाच्‍या अतिरिक्‍त उंचीमुळे प्रवाशांची दमछाक

पादचारी पुलाच्‍या अतिरिक्‍त उंचीमुळे प्रवाशांची दमछाक
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः पनवेल रेल्वे स्थानक मार्गे दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉर जाणार आहे. या मार्गिकेच्या कामासाठी पनवेल स्थानकातील चार नंबर फलाटावरील पूल बंद करण्यात आला आहे. मात्र प्रवाशांच्‍या सोयीसाठी दुसरा नवीन पूल सुरू झाला आहे; परंतु त्याची उंची वाढविल्याने वृद्ध, रुग्ण व गरोदर महिलांची दमछाक होत आहे.
पनवेल रेल्वेस्थानकात दोन पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. यातील एक पूल हा फलाट क्रमांक पाचवरून सहा, सातवर जाण्यासाठी वापरला जातो; तर दुसरा पूल हा नवीन पनवेलला जोडलेला आहे. पनवेल स्‍थानकातून दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉर जाणार आहे. त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकामध्ये फलाट क्रमांक चारवर कॉरिडॉरसाठी नवीन मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून डबलडेकर मालवाहतूक होणार असल्याकारणाने पुलाची उंची वाढवण्यात आली आहे. सदर पूल जवळपास आठ फूट वाढवण्यात आला आहे. हा पूल सुरू झाल्याने रेल्वेस्थानकातील प्रवाशांची चेंगराचेंगरीतून सुटका झाली आहे; मात्र पुलाची उंची वाढविल्याने त्याचा मनस्ताप आबालवृद्ध, गरोदर महिला व रुग्ण आदींना बसत आहे. पुलाच्या उंचीसंदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, या ठिकाणी लवकरच स्वयंचलित जिना बसविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com