मुख्याध्यापकावर गैरवर्तनाचे आरोप

मुख्याध्यापकावर गैरवर्तनाचे आरोप

कासा, ता. ४ (बातमीदार) ः तलासरी तालुक्यातील वरवाडा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने गैरवर्तन केल्याची तक्रार येथील विद्यार्थिनी आणि पालकांनी केली आहे. संबंधित मुख्याध्यापकाला डहाणू प्रकल्प अधिकाऱ्याने कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा मागवला आहे. सत्यता पडताळून कार्यवाही करण्यात येईल, असे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तलासरी तालुक्यातील वरवाडा आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार पालक आणि विद्यार्थिनींनी केली आहे. डहाणू आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा देण्यास सांगितले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आश्रमशाळेतील १९ विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार केली असून यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
--
या प्रकरणात संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- सत्यम गांधी, प्रकल्पाधिकारी, आदिवासी प्रकल्प, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com