एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत २० हजारांचा दंड वसूल

एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत २० हजारांचा दंड वसूल

एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेत २० हजारांचा दंड वसूल

ठाणे, ता. ४ (बातमीदार) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने संयुक्तरीत्या आज एकल वापर प्लास्टिक (सिंगल यूज प्लॅस्टिक कॅरिबॅग) बंदीबाबत मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह १२ आस्थापनांना दिलेल्या भेटीत साडेआठ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विविध आस्थापनांतून साडेआठ किलो प्रतिबंधित प्लास्टिक बाऊल, प्लास्टिक चमचे, ग्लासेस आदी साहित्य जप्त करण्यात आले; तरी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून एकल वापर प्लास्टिकचा वापर तसेच साठा करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com