ऑनलाईन पोर्टल सुरू ठेवण्याची बांधकाम कामगारांची मागणी

ऑनलाईन पोर्टल सुरू ठेवण्याची बांधकाम कामगारांची मागणी

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहेत, पण या काळात बांधकाम कामगारांची कामे ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू ठेवावीत, अशी मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेने कामगार विभागाच्या उपसचिवांकडे केली आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये राज्यातील पंधरा लाख बांधकाम कामगारांचे अर्ज जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्या अर्जांवर संबंधित विभागाकडून कारवाई करावी, तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मध्यान्ह भोजन योजनेतील अडीच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर आयएएस अधिकाऱ्याची सचिव म्हणून नेमणूक करावी, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

याबाबत बोलताना शिष्टमंडळातील सदस्य कॉ. शंकर पुजीर म्हणाले की, कामगारांची सर्व कामे बंद असल्याने ३० लाख कामगारांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी २०२२ साली राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस मुख्य निवडणूक उप आयुक्त यांनी ऑनलाईन पोर्टलचे काम बंद ठेवण्याची आवश्यकता नसते, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे यावेळीही ऑनलाईन पोर्टल सुरू ठेवावे, असेही पुजारी म्हणाले. आपल्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने राज्याचे निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना दिले. यावेळी सागर तायडे, विनिता बळीकुंद्रे, कॉ. रमेश जाधव, काशिनाथ नकाते, आनंद भालेराव, मनीष गौरखेडे, रवी पवार, तानाजी गायकवाड, सुरज भालेराव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com