‘...तर ठाण्यात कमळच फुलले पाहिजे’

‘...तर ठाण्यात कमळच फुलले पाहिजे’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महायुतीचा ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचा मेळावा पार पडला. अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी मोदी हेच उमेदवार असतील, असा सूर युतीच्या नेत्यांनी आळवला. हाच धागा पकडत जर मोदींनाच निवडून आणायचे असेल तर ठाणे लोकसभेवर कमळच फुलले पाहिजे, अशी चर्चा समाजमाध्यमांवर भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. ठाण्याची जागा जिंकायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असा दावाही भाजपकडून केला जात आहे.

ठाणे लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. तर भाजपकडूनदेखील हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या स्थानिक मंडळींनी ठाण्यावर यापूर्वीदेखील भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे. मधल्या काळात युतीचा धर्म पाळताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. आता भाजपची ताकद केवळ ठाण्यातच नाही तर जिल्ह्यातही वाढत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. अशातच बुधवारी ठाणे लोकसभेचा महायुतीचा मेळावा उमेदवाराविनाच पार पडला. या वेळी नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील, असा सूर भाजप आणि शिवसेनेनेही आळवला. त्यामुळे जर मोदीच उमेदवार असतील तर येथून कमळच फुलले पाहिजे, असा प्रचार समाजमाध्यमावर भाजपकडून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com