रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

मुंबई, ता. ४ : कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या मध्य रेल्वेच्या नऊ रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्काराने गौरवले आहे. यात मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन आणि भुसावळ विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान दाखवणाऱ्या मुंबई विभागातील कोचिंग डेपोचे सहायक विनोद सपकाळे, कल्याण लोको शेडचे कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) शाहिद अन्सारी, नागपूर विभागाचे स्थानक उपव्यवस्थापक विवेक गजभिये, स्थानक उपव्यवस्थापक साहेब हुसेन, पुणे विभागाचे वरिष्ठ अभियंता रोहित पोहेकर, गेटमन संतोष भिकाजी, सोलापूर विभागाचे ट्रॅक मेंटेनर विजय कुमार राम, स्थानक उपव्यवस्थापक जयप्रकाश आणि भुसावळ विभागाचे पॉइंट्समन गणेश गाडगे यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com