महादेव बेटिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल

महादेव बेटिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल

महादेव बेटिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी (ता. ३) १५ हजार कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ३,०३० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी अटक आरोपी दीक्षित कोठारीला मुख्य आरोपी करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोठारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपपत्रात अन्य ३० आरोपींची नावेही समाविष्ट आहेत.
कोठारी प्रामुख्याने ‘लोटसबुक ०८’ नावाच्या बेटिंग ॲपचा मालक आहे. ही कंपनी महादेव बेटिंग ॲपशी संबंधित कंपनी असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. कोठारीने ॲपद्वारे सट्टेबाजी केल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. एकूण आठ बँक खात्यांच्या माध्यमातून बेटिंगची रक्कम हस्तांतरित केली जात होती. कोठारीकडून एकूण ५ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, कोठारीने सट्टेबाजीसाठी वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर केला, बँक खात्यात पैसे व्यवहार केले.
...
क्रिकेट सामने, निवडणुकांवर सट्टेबाजी
कोठारीने महादेव ॲपच्या माध्यमातून अनेक अकाउंट तयार केली होती. या ॲप्सच्या माध्यमातून देशातील क्रिकेट सामने आणि निवडणुकांवर सट्टा लावला जात होता. कोठारी गेल्या ५ वर्षांपासून सट्ट्यासंबंधित व्यवहारात होता. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. यानंतर हे प्रकरण तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यावर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com