३८ मालमत्ताधारकांवर न्यायालयात खटला

३८ मालमत्ताधारकांवर न्यायालयात खटला

पाच कोटी ७१ लाखांचे धनादेश वटले नसल्याने कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मालमत्ता कराचा भरणा करण्यात दिरंगाई करणाऱ्या ८९२ धनादेश (चेक) वटले नाहीत. यातील ८५३ प्रकरणांमध्ये पालिकेकडून ३७ कोटी ८३ लाख रुपयांची वसुली केली आहे. तसेच पाच कोटी ७१ लाखांचा मालमत्ता कर थकीत असलेल्या ३८ मालमत्ताधारकांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
मालमत्ता करभरणा करणे मालमत्ताधारकांना सोईचे जावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोखीने देयक जमा करण्यासोबतच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पद्धतीनेही कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, असे असताना २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये धनादेशाद्वारा करभरणा केलेल्या ८९२ प्रकरणात धनादेश वठलेले नसल्याचे आढळून आले. यात एकूण ४३ कोटी ५४ लाखांचा मालमत्ता कर अपेक्षित होता. मात्र, धनादेश वठले नसल्याने ८९२ मालमत्ताधारकांना पालिकेच्या वतीने परक्राम्य संलेख अधिनियम-१८८१ नुसार नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर यापैकी ८५३ मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील एकूण ३७ कोटी ८३ लाख रुपयांचा करभरणा केला. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही करभरणा करण्यात कुचराई करणाऱ्या उर्वरित ३८ मालमत्ताधारकांविरोधात खटला दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com