मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ मतदारसंघांमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल येथील याकूब बेग हायस्कूल व तुर्भे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महापालिका शाळा क्रमांक आठच्या वतीने मतदानावरती आधारित घोषवाक्य स्पर्धा व गुजराती शाळा क्रमांक नऊमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
स्वीप कार्यक्रम राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली, स्वीप पथकप्रमुख, अधिकारी, पालिका मुख्य अभियंता संजय जगताप व गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकित आयुक्तांनी नवमतदारांना मतदान करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृतीविषयक कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्याबरोबरच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, महिला बचत गट, मोठमोठ्या सोसायट्यांमध्येदेखील मतदान जनजागृतीविषयक कार्यक्रम राबविण्याबाबत सांगितले. तसेच आत्तापर्यंत झालेल्या जनजागृती कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे मावळ मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत याकूब बेग हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा, तुर्भे यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महापालिकेच्या शाळा क्रमांक आठच्या वतीने मतदानावर आधारित घोषवाक्ये स्पर्धा व गुजराती शाळा क्रमांक नऊमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे, रांगोळ्या व घोषवाक्ये लिहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.