

वाडा, ता. १४ (बातमीदार) : तालुक्याला वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेरजा आणि गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या असताना पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने आठ गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नाही. त्यामुळे गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
सागमाळ, दिवेपाडा, टोकडेपाडा, मुमाळ, पाचघर, घोडसाखरे, नवापाडा, वरसाळा या गाव-पाड्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यात १६८ गावे आणि २०० हून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत असून त्या प्रमाणात पाणीटंचाईचे निराकरण होत नसल्याने समस्येने उग्र रूप धारण केले आहे.
तालुक्यातील रोलिंग मिल, शीतपेये बनविणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होतो. पाणी कमी पडते, म्हणून खासगी कूपनलिकेतून पाण्याचा उपसा केला जातो. खासगी कंपन्यांना दररोज लाखो लिटर पाणी लागते. त्यांना पाणी मिळावे, म्हणून वैतरणा नदीवर बंधारा बांधला आहे. मार्चनंतर पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर खासगी कूपनलिकेचे पाणी नेले जाते. खासगी कंपनी पाण्यासाठी बंधारा बांधते, तर नागरिकांच्या पाण्यासाठी बंधारे का बांधले जात नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नळ योजना, विहिरी, तलाव आणि इतर योजनांवर भर दिला जात असल्याने नैसर्गिक स्रोतांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच टंचाईच्या झळा तीव्र आहेत.
कोट्यवधींचा खर्च
तालुक्यात जलजीवन योजना राबवताना कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. वाड्यात १३८ हून अधिक ठिकाणी जलजीवन योजना राबविण्यात आली, तर जल प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुक्यातील १० ग्रामपंचायती आणि १७ महसुली गावांसाठी २५ कोटी ७० लाखांच्या योजना आहेत. प्रत्येक गावातील मंजूर निधी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे, मात्र बहुतांशी योजना अपूर्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.