‘आप’कडून ‘संविधान वाचवा, तानाशाही हटवा’ दिन साजरा ‘आप’कडून ‘संविधान वाचवा, तानाशाही हटवा’ दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आम आदमी पक्षाने (आप) आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘संविधान वाचवा, तानाशाही हटवा दिन’ म्हणून साजरी केली. पक्षाच्या स्वयंसेवकांनी आझाद मैदानावर एकत्र येत भारताच्या राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
भाजप आणि फॅसिस्ट मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून भारताच्या संविधानावर हल्ला होत आहे. प्रत्येक तत्त्वाचे आणि प्रत्येक संस्थेचे अक्षरश: अवमूल्यन केले जात आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदा अटकेनंतर त्यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आली आहे. मोदी सरकारच्या पराभवाची वेळ जवळ आली असल्याचा दावा ‘आप’ने केला आहे. ही निवडणूक भारतीय राज्यघटना वाचवणारी असल्याचे ठाम मत पक्षाचे सहसचिव रुबेन मस्करेन्हास यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दडपशाहीविरुद्ध लढण्यासाठीचे कधीही न संपणारे प्रेरणास्थान आहेत. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष संविधानाचा कधीही नाश होऊ देणार नाही, असे ‘आप’चे मुंबई कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी ठणकावले. या वेळी सरचिटणीस पायस वर्गीस, उपाध्यक्ष संदीप मेहता आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.