

उरण, ता. २१ (बातमीदार) : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी तसेच लोकशाहीत मतदान हक्काची जाणीव करण्यासाठी प्रशासन पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उरण येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभा निवडणूक २०२४च्या निमित्ताने मतदान जागृती अभियान स्वीप कार्यक्रमाअंतर्गत उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्या आदेशानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने पथनाट्य तसेच मतदारराजाला जागृत करण्यासाठी उरण तालुक्यातील गावागावात दुचाकी रॅली काढण्यात आली. चाणजे ग्रामपंचायत हद्दीतून सुरू झालेल्या दुचाकी रॅलीची सांगता मोरा जेट्टी परिसरात झाली. शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पवार यांनी या दुचाकी रॅलीचे नेतृत्व केले. या रॅलीत शेवे केंद्रातील शिक्षक व मुख्यध्यापक सहभागी झाले होते. या वेळी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क न चुकता बजावला पाहिजे, असे संतोष पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.