

महिंद्रा महाराष्ट्रात उभारणार हरित ऊर्जा प्रकल्प
१५३ मेगावॉटची क्षमता; १,२०० कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महिंद्रा ग्रुप महाराष्ट्रात तब्बल १५३ मेगावॉट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यामध्ये जवळपास १०१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प; तर ५२ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी १,२०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे; तसेच या प्रकल्पासाठी सुमारे ५०० एकर जमीन लागणार आहे.
कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते; तसेच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजनिर्मितीवरही मर्यादा येतात. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार महिंद्रा ग्रुपने महाराष्ट्रात ठिकठिकाणी १५३ मेगावॉटचे सौर आणि पवन असे हायब्रिड वीज प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वर्षाला येथून तब्बल ४६० दशलक्ष युनिट एवढी वीजनिर्मिती होऊ शकणार असून कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज ग्रीडच्या माध्यमातून राज्यात कुठेही वापरणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.