खोदकामामुळे मनोरीत पाण्याची समस्‍या

खोदकामामुळे मनोरीत पाण्याची समस्‍या

खोदकामामुळे मनोरीत पाण्याची समस्‍या
जलवाहिनीची दुरुस्‍ती करण्याची पालिकेकडे मागणी
मालाड, ता. २५ (बातमीदार) ः पालिकेच्या खोदकामात जलवाहिनी फुटल्‍याने मालाड पश्‍चिमेतील मनोरी गावात गेल्‍या आठवडाभरापासून पाण्याची समस्‍या सतावत आहे. याबाबत गावातील रहिवासी उत्कर्ष बोरले यांनी पालिकेकडे तक्रार दिली आहे.
मनोरी जेट्टी बस थांब्‍याजवळ जलकामे विभागाकडून खोदकाम सुरू होते. मागील आठ ते दहा दिवस झाले तरी जलवाहिनी पूर्ववत केली नसल्याने बोरले कुटुंबीयांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. उत्कर्ष बोरले यांनी जलकामे खाते पी उत्तर विभागीय सहायक अभियंता रवींद्र कुमार मौर्य यांना भेटून लेखी तक्रार दिली. तसेच विभागीय सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरांनाही भेटून माहिती दिली.
तक्रारदाराला माझ्याकडे पाठवा. त्यांचा प्रश्न सुटेल, अशी प्रतिक्रिया जलकामे खाते, पी उत्तर विभाग सहायक अभियंता रवींद्र मौर्य यांनी दिली.

मागील दहा दिवसांपासून पाण्याची समस्‍या सतावत आहे. सहाय्यक अभियंता, सहायक आयुक्तांना भेटून माहिती दिली. मात्र, काहीच झाले नाही.
- उत्कर्ष बोरले, तक्रारदार ग्रामस्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com