Crime News: हॉटेलचा वेटरच निघाला चोर;  पाच लाख घेवून गेला पळून!

Crime News: हॉटेलचा वेटरच निघाला चोर; पाच लाख घेवून गेला पळून!

हॉटेलमधून पाच लाख रुपयांची चोरी करून वेटरचे पलायन
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : कोपरखैरणेतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने हॉटेलच्या कॅश काऊंटरचे ड्रॉवर उचकटून त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम व सह्या केलेले कोरे चेक चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील वेटर व त्याच्या साथीदाराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.


या प्रकरणातील आरोपी नरेश मांझी (वय २५) हा मूळचा ओडिशा राज्यातील असून तो महापे उड्डाणपुलाजवळ असलेल्या हॉटेल सांचीमध्ये वेटर म्हणून काम करत होता. सोमवारी पहाटे सव्वापाचच्‍या सुमारास आरोपी नरेश मांझी याने आपल्या साथीदारासह हॉटेलमध्ये खिडकीवाटे प्रवेश केला.

त्यानंतर त्याने हॉटेलच्या कॅश काऊंटरच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम तसेच हॉटेल मॅनेजरच्या टेबलमधील सह्या केलेले चेकबुक चोरून नेले. सकाळी हॉटेल उघडण्यात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, नरेश मांझी व त्याच्या साथीदाराने ही चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हॉटेल मॅनेजर सुनील शेट्टी याने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com