मतदानासाठी दिव्यांग, ज्येष्ठांसाठी ‘सक्षम’

मतदानासाठी दिव्यांग, ज्येष्ठांसाठी ‘सक्षम’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी ‘सक्षम’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून त्यांना मतदान नोंदणीच्या तपशीलापासून ते त्यांच्या मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी या ॲपची मदत होणार आहे. तसेच मतदानाच्या वेळी केंद्रावर पोहोचण्यासाठी व्हीलचेअरची मागणीही त्यांना या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे.
सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यात महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराची रान उठवले आहे. ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. या वर्षी मतदारांची संख्या वाढावी, यासाठी सरकारमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी सरकारमार्फत सक्षम ॲपची निर्मिती केली आहे. अनेकदा दिव्यांग व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांना आजारपणामुळे मतदानासाठी घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे मतदानाच्या संख्येत घट होताना दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने दिव्यांग आणि ज्येष्ठांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी त्यांना ‘सक्षम’ केले आहे. या ॲपमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या त्यांच्या मतदान केंद्राची माहिती मिळवता येणार आहे. तसेच त्या ॲपवर नोंदणी केल्यानंतर त्यांना केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात ३४ हजार ९७६ दिव्यांग नागरिक तर, ५८ हजार ९६६ हे ८५ पेक्षा जास्त वय असणारे मतदार आहेत. यामधील अनेक नागरिक हे आजारपणाला त्रासलेले आहेत. त्यामुळे त्यांना मतदान नोंदणी किंवा मतदान केंद्र कुठे असेल, हे तपासणेही कठीण होते. त्यांचे हे मत वाया जाऊ नये, यासाठी या ॲपच्या माध्यमातून त्यांना त्यांचे मतदान केंद्र तपासता येणार आहे. तसेच, मतदानासाठी केंद्रावर येताना त्यांना पाहिजे असलेली सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागणीही करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
............
ॲपचा वापर कसा करावा?
गुगल प्ले स्टोरवरून ‘सक्षम’ हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲपवर दिव्यांग मतदारांना नवीन मतदार नोंदणी, अपंग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करणे, मतदानाचे स्थान बदलण्याची विनंती, दुरुस्त्या करणे, स्थिती ट्रॅक करणे असे विविध कामे करता येणार आहेत. तसेच ज्या मतदारांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करायचे आहे, त्यांच्यासाठी निवडणुकीच्या दिवशी या ॲपच्या माध्यमातून व्हीलचेअरही उपलब्ध करून देता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com