नवी मुंबईत उद्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा

नवी मुंबईत उद्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा

नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप २०२४चे नवी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. १७वी राष्ट्रीय योगासन स्पर्धा शनिवारी (ता. २७) नेरूळ येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक १०१ येथे होणार आहे. या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये देशभरातील योग अभ्यासक सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई चॅम्पियन सर्व्हिस फाऊंडेशनचे सहकार्य मिळणार आहे, असल्याचे आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रिना अग्रवाल यांनी सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू तसेच दिल्ली येथील योगसाधक सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com