कॉलम

कॉलम

वसुधा राऊत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
बोर्डी (बातमीदार) : वसुधा दिनकर राऊत यांचे वयाच्या ८४ वर्षी बुधवारी (ता. २४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे संस्थापक, उपाध्यक्ष दिनकर राऊत त्यांची पत्नी होत्या. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. २५) सकाळी दहा वाजता बोर्डी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील, तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन. के. पाटील, तसेच कार्यवाह विजय म्हात्रे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शेतीवाडीमधून तयार झालेल्या शेतमालाची खरेदी-विक्री, तसेच महिलांना शेतीतील ज्ञान देऊन उत्पादन कसे वाढवावे, याबद्दल त्या सतत मार्गदर्शन करत असत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---
आशय राऊत यांचा ‘उत्कृष्ट अध्यक्ष’ म्हणून सन्मान
विरार (बातमीदार) : वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष आशय हरेश्वर राऊत यांना ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स ॲवॉर्ड` या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे एका सोहळ्यात त्यांना पदक देऊन गौरविण्यात आले. सहकारी बँकेच्या विकासात चांगली कामगिरी केल्याने ऑल इंडिया डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय आर्थिक व सामाजिक विकासास वैयक्तिक भरीव योगदान दिले आहे. आशय राऊत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com