पुनर्विकास प्रकल्पची आढावा बैठक

पुनर्विकास प्रकल्पची आढावा बैठक

बीडीडी चाळ पुनर्विकास आढावा बैठक
प्रभादेवी, ता. २५ (बातमीदार) : वरळी बीडीडी चाळ क्रमांक ३० व ३१ च्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळी म्हाडा अधिकारी, टीसीसी कन्स्‍ट्रक्‍शन कंपनीचे अधिकारी, वास्तुविशारद व रहिवाशी यांच्या उपास्थितीत प्रकल्प आढावा बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील बीडीडी चाळ क्रमांक ३० व ३१ च्या रहिवाशांनी मूलभूत सोयी सुविधांबाबत उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांचे निरसन केल्यानंतर इमारत क्रमांक डी १ व ई १ चे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करून रहिवाशांना घराचा ताबा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सकारात्‍मक चर्चा झाल्‍याचे रविकांत सारवान, बजरंग काळे, सुरेश खोपकर यांनी सांगितले. नियोजित वेळेत इमारत क्रमांक १ डी व १ ई च्या ४० मजल्याचे बांधकाम पूर्ण करून सदनिकेअंतर्गत काम जलदगतीने सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रहिवाशांना घराचा ताबा मिळेल, या आनंदात रहिवाशांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com