झाडांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई
झाडांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई

झाडांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई झाडांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई

झाडांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई
पर्यावरणप्रेमींकडून संताप; महापालिकेचे दुर्लक्ष
वाशी, ता. २५ (बातमीदार) : मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत. मात्र, नवी मुंबईत खुलेआम झाडांवर हॉटेल व्यावसायिक तसेच गाळेधारक विद्युत रोषणाई करत असल्याचे दिसून येत आहे. तर प्रसिद्धीसाठी बॅनरबाजी करणाऱ्यांनी झाडांच्‍या बुंध्याला खिळे मारून डिजिटल होर्डिंग्ज लावले आहेत. झाडांना अशाप्रकारे हानी पोहोचवली जात असल्‍याने पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात येतो. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी उद्यान विभागावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र शहरामध्ये जाहिरातबाजींसाठी झाडांना इजा पोहोचविण्यात येत आहे. शहरातील अनेक झाडांवर बिनदिक्कत खिळे मारून जाहिरातींचे फलक ठोकले जात आहेत. त्‍यातच अनेक गाळेधारक व हॉटेल व्‍यावसायिकांकडून दुकानासमोरील झाडांवर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई केली जात आहे. त्यामुळे झाडांना हानी पोहोचत असून त्‍यांचे आयुर्मान कमी होत असल्‍याचे सांगण्यात येत आहे. शहरात सध्या झाड तोडण्यासाठी वृक्षप्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्‍याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. शहरातील ठाणे- बेलापूर मार्ग, पामबीच, ऐरोली, घणसोली, रबाळे, कोपरखैरणे येथील अंतर्गत रस्त्यावरील विविध संस्था, दुकानांच्या जाहिरातींसाठी झाडांवर विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरातील झाडांचे किमान ५० ते १०० वर्षे सरासरी आयुष्य असते. मात्र, इजा पोहोचवल्याने १५ ते २० वर्षांनी घट होत असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.
...........................
झाडांना खिळे ठोकून जाहिरातबाजी करणाऱ्यांच्‍या विरोधात या आधीही दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शहरामधील ज्‍या व्यावसायिकांनी झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येईल. विभाग अधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.
-दिलीप नेरकर, उपआयुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com